स्वदेशात व समाजात आवश्यक कर्तव्यकर्मे करून स्वावलंबन साध्य करता करता स्वाध्याय, स्व-अनुशासन, उद्योग व सहयोग याद्वारे जी स्वत:ची व समाजाची ओळख प्राप्त होते, ते शिक्षण!
एकदा गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मी आनंददायी मुक्त शिक्षणाची कल्पना वर्णन करून सांगितली, व विचारले, ‘कुणा-कुणाला अशी शाळा आवडेल?’ सर्व मुले निर्विकार चेहर्याने चुपचाप बसून राहिली. कोणीच हात वर केला नाही. अशी शाळा असू शकते, यावर त्यांचा विश्वासच बसला नसावा. शिवाय समोर त्यांचे शिक्षक उभे होते. त्यांच्या देखत आवड व्यक्त करण्याची त्यांची बिशाद नव्हती.......